Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलै रोजी सुरू झाला.
या सामन्यात पहिल्याच दिवशी ९ व्या षटकात यशस्वी जैस्वालची बॅट ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीचा सामना करताना तुटली.
ख्रिस वोक्सने टाकलेला चेंडू जैस्वालच्या बॅटच्या हँडेलवर जोरात आदळला आणि त्यामुळे त्याच्या हँडेल जवळ त्याची बॅट तुटली. त्यामुळे त्याला दुसरी बॅट मागवावी लागली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू सामन्यावेळी नेहमीच त्यांच्या बॅगमध्ये दोनपेक्षा अधिक बॅट ठेवतातच.
पण आंतरराष्ट्रीय खेळाडू वापरत असलेल्या बॅट या साधरण बॅटपेक्षा बऱ्याच महागही असतात.
यशस्वी जैस्वाल एसजी कंपनीची बॅट वापरतो. ही कंपनी बॅट बनवण्यासाठी ओळखलीही जाते. अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या बॅट वापरतात.
मिडिया रिपोर्ट्सनुसार जैस्वालच्या एका बॅटची किंमत ही साधारण ८० ते ९० हजार रुपये आहे. तसेच जरी डिसकाऊंटमध्ये घेतली, तरी ७० ते ८० हजार रुपयांदरम्यान ही बॅट जाते.
दरम्यान, एसजीच्या बॅट या कमी किंमतीच्याही मिळतात, पण त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वापरत असलेल्या बॅटपेक्षा थोड्या साधारण असतात.
जवळपास १३०० रुपयांपासून या बॅट आपण खरेदी करू शकतो. ज्या आपण स्थानिक सामने खेळण्यासाठी वापरू शकतो.