Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात २३ ते २७ जुलै दरम्यान मँचेस्टरला कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे.
या सामन्यात जो रुटला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
जो रुटने जर या सामन्यात १२० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर जो रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविडला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येईल.
जो रुटने सध्या १५६ कसोटी सामन्यात १३२५९ धावा केल्या आहेत. तो सध्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे.
सध्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये रुटच्या पुढे असणाऱ्या चार खेळाडूंबद्दल जाणून घेऊ. (२३ जुलै २०२५ पर्यंत)
भारताचा राहुल द्रविड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १६४ सामन्यांत १३२८८ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकाचा जॅक कॅलिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६६ सामन्यात १३२८९ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १६८ कसोटी सामन्यांत १३३७८ धावा केल्या आहेत.
भारताचा सचिन तेंडुलकर सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांत १५९२१ धावा केल्या आहेत.