Pranali Kodre
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी आणि डान्स कोरियोग्राफर धनश्री वर्मा हे जोडपे सध्या चर्चेत आहे.
त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा असून त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तसेच चहलने त्यांचे फोटोही डिलिट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत आहेत.
दरम्यान, त्यांचे ११ डिसेंबर २०२० लग्न झाले होते. त्याच्या काही महिने आधीच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती.
झलक दिखला जा या रिऍलिटी शोच्या ११ व्या पर्वात धनश्री सामील झाली होती, यावेळी तिने त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती.
तिने सांगितल्यानुसार कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन दरम्यान सामने होत नसल्याने क्रिकेटपटू घरी कंटाळले होते. त्यावेळी युझीने डान्स शिकण्याचा निर्णय घेतला.
युझीने धनश्रीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले, त्यावेळी ती डान्स शिकवायची. त्यामुळे त्याने तिच्याशी संपर्क केला आणि डान्स शिकवणार का असं विचारलं. तिने त्याला डान्स शिकवण्याचे मान्य केले.
यानंतर हळुहळू त्यांच्यातील नातं प्रेमात बदललं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
मात्र आता चार वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप दोघांपैकी कोणीही वेगळे होण्याबाबत अधिकृत भाष्य केलेलं नाही.