Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये ३ जानेवारी २०२५ पासून सिडनीमध्ये कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सुरू झाला आहे.
या सामन्याला पिंक टेस्ट असंही म्हटलं जात आहे. गुलाबी रंगामध्ये स्टेडियम रंगलेलंही दिसत आहे. पण, पिंक डे टेस्टमागील कारण काय, हे थोडक्यात जाणून घेऊ.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिडनीमध्ये जो कसोटी सामना खेळण्यात येतो, त्याला पिंक डे कसोटी असं म्हटलं जातं.
कर्करोगाबाबत विशेषत: स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीच्या करण्याच्या हेतूने हा सामना खेळला जातो. या जनजागृतीसाठी गुलाबी रंगाचा प्रतिक म्हणून वापर केला जातो.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या पत्नीचे जेन हिचे स्तनाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यानंतर २००९ नंतर हा पिंक डे कसोटी सामना खेळला जातो.
यासाठी मॅकग्रा फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याच कोलॅबरेशन असून ते सिडनी कसोटीतून कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासोबतच कर्करोगाच्या रुग्णांसाठी निधीही गोळा केला जातो.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू गुलाबी रंगाची कॅप घालतात, संपूर्ण स्टेडियममध्येही गुलाबी रंग वापरला जातो आणि अगदी स्टम्प्स देखील गुलाबी रंगाचे असतात.
या सामन्याचा तिसरा दिवस जेन मॅकग्रा दिवस म्हणून साजरा केला जातो. खेळाडू आपल्या कॅप निधी गोळा करण्याच्या हेतूने ग्लेन मॅकग्राकडे सुपूर्त करतात.
पण हा कसोटी सामना दिवसाच खेळला जात असल्याने चेंडू नेहमीप्रमाणे लाल रंगाचाच वापरला जातो, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.