सकाळ डिजिटल टीम
भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली केली, कधी आणि कशी झाली जाणून घ्या.
पिंगली वेंकय्या हे आंध्र प्रदेश राज्यातील एक शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनीच भारतासाठी एक राष्ट्रध्वज असावा, अशी संकल्पना मांडली आणि त्याची रचना केली.
१९२१ मध्ये विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पिंगली वेंकय्या यांनी महात्मा गांधींना ध्वजाचे डिझाइन दाखवले. गांधीजींच्या सूचनेनुसार त्यात काही बदल करण्यात आले.
सुरुवातीला वेंकय्या यांनी तयार केलेल्या ध्वजात लाल (हिंदू) आणि हिरवा (मुस्लिम) असे दोन पट्टे होते.
महात्मा गांधींनी या दोन रंगांमध्ये पांढरा पट्टा जोडण्याची सूचना केली, जो इतर सर्व समुदायांचे प्रतिनिधित्व करेल. तसेच, देशाच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून मध्यभागी चरखा ठेवण्याचा सल्ला दिला.
१९३१ मध्ये काँग्रेसने या ध्वजाला अधिकृतपणे स्वीकारले. यावेळी लाल रंगाऐवजी केशरी रंग वापरण्यात आला आणि तो केशरी, पांढरा व हिरवा अशा तीन रंगांचा झाला.
२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने स्वतंत्र भारतासाठी या ध्वजाला स्वीकारले. पण, चरख्याच्या जागी सारनाथ येथील अशोकस्तंभावरील अशोक चक्र (धम्मचक्र) ठेवण्यात आले.
अशोक चक्र हे धर्मचक्र किंवा प्रगतीचे चक्र मानले जाते. त्यात २४ आरे आहेत, जे दिवसाचे २४ तास दर्शवतात. हे सत्य आणि न्यायाचे प्रतीक आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण ३:२ असे निश्चित करण्यात आले. पिंगली वेंकय्या यांनी बनवलेल्या ध्वजामुळे त्यांना 'झेंडा वेंकय्या' असेही म्हटले जाऊ लागले होते.