सुनील छेत्री 'नॉटआऊट 150'

प्रणाली कोद्रे

भारत आणि अफगाणिस्तान

फिफा विश्वचषक 2026 आणि आशिया कप 2027 साठीच्या क्वालिफायर्सच्या दुसऱ्या फेरीत 26 मार्च 2024 रोजी गुवाहाटीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला.

Sunil Chhetri | PTI

सुनील छेत्री

भारताचा फुटबॉल स्टार सुनील छेत्रीसाठी हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 150 वा सामना होता. मात्र त्याला या सामन्यात विजयी भेट मिळाली नाही.

Sunil Chhetri | ANI

सन्मान

दरम्यान, छेत्रीचा या सामन्याआधी खास सन्मानही करण्यात आला.

Sunil Chhetri | ANI

छेत्रीचा गोल

छेत्रीने या सामन्यात 38 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोलही साकारला. मात्र अफगाणिस्तानकडून सामन्याच्या अखेरीस 2 गोल झाल्याने भारताने हा सामना गमावला.

Sunil Chhetri | AFP

आंतरराष्ट्रीय गोल

दरम्यान, संघाने सामना गमावला असला, तरी छेत्रीसाठी वैयक्तिकरित्या हा सामना स्पेशल होता. त्याने गेलेला गोल आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील ९४ वा गोल ठरला.

Sunil Chhetri | ANI

तिसरा खेळाडू

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये छेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

पदार्पण

छेत्रीने 12 जून 2005 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले होते.

Sunil Chhetri | X/IndianFootball

पराक्रम

39 वर्षीय छेत्रीने पदार्पणात गोल केला होता. इतकेच नाही तर त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25 व्या, 50 व्या, 75व्या, 100 व्या, 125व्या आणि आता 150व्या सामन्यातही किमान एक गोल तरी केला आहे.

Sunil Chhetri | X/IndianFootball

विराट T20 मध्येही किंग! 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

Virat Kohli | Sakal