सकाळ डिजिटल टीम
माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. त्याने १९८६ साली संध्या हीच्याशी लग्न केले.
पण त्यांच्यामध्ये अभिनेत्री फरहीन खानसोबत सुरू असलेल्या अफेयरमुळे भांडण झाले.
फरहीन खानने बॉलीवूडमध्ये 'जान तेरे नाम' या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दिची सुरूवात केली.
मनोजचे लग्न संध्यासोबत झाले असताना तो अभिनेत्री फरहीनसोबत रहायचा.
डिव्होर्सपूर्वीच मनोज सहा वर्ष फरहीनसोबत राहिला, असे संध्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
पण त्यांच्यात डिव्होर्स झाल्यानंतर त्याचे फरहीनसोबतचे नाते समोर आले व त्याने फरहीन सोबत लग्न केले.
फरहीन सोबतच्या नात्यामुळे त्याचे वडिलांसोबतही भांडण झाले व वडिल पहिली पत्नी संध्या सोबत राहू लागले.
फरहीन व मनोज ला एक मुलगा आहे.
मनोज प्रभाकर सध्या नेपाळ क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.