सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लुईस होते.
नोएला लग्नापूर्वी पुण्यातील ब्ल्यू डायमंड होटेलमध्ये रिसेप्शनिस्टचे काम करायची.
कांबळीच्या दारूच्या व्यसनामुळे व त्याच्या नव्या अफेयरमुळे त्यांचे नाते तुटले.
कांबळीचे अॅंड्रिया हेविटसोबत अफेयर सुरू होते.
कांबळी व नोएला यांच्यातील डिव्होर्सनंतर, फेसबुक पेजवरील माहितीनुसार ती सध्या महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये काम करते.
त्याचबरोबर ती पुण्यातील ख्रिश्चन सेमेटरी सोसायटीसोबत देखील काम करते, जी संस्था लहान मुंलाची काळजी घेते.
२००६ मध्ये कांबळीने अॅंड्रिया हेविटसोबत कोर्ट मॅरेज केले होते.
विनोद कांबळीला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे.
कांबळीची दुसरी पत्नी अॅंड्रिया हेविट त्याच्या पहिल्या पत्नीच्या संपर्कात असते, असे कांबळीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.