संतोष कानडे
मुघल काळात गुन्हेगारांना अत्यंत कठोर आणि क्रूर शिक्षा दिल्या जात असत.
राजद्रोह, चोरी किंवा बंडखोरीसाठी सार्वजनिक शिक्षा देऊन लोकांमध्ये भीती निर्माण केली जायची.
काही दोषींना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची शिक्षा दिली जात असे.
हात-पाय तोडणे किंवा फाशी देणेही सामान्य मानले जात होते.
काही वेळा आरोपींना अनेक दिवस उपाशी ठेवले जात असे. त्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू व्हायचा
भर चौकात शिक्षा देऊन इतरांना इशारा दिला जायचा. त्यामुळे मुघल साम्राज्याविषयी दहशत निर्माण होत असे.
कठोर शिक्षा ही मुघल सत्तेची ताकद दाखवण्याचे साधन मानली जात होती.
त्या काळातील शिक्षा आजच्या मानवी हक्कांच्या दृष्टीने अत्यंत अमानवी मानल्या जातात.