Monika Shinde
भारतीय राष्ट्रध्वज खादीपासून तयार केला जातो. या प्रक्रियेची सुरुवात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील उदगीर येथून होते. येथे हातमागावर शुद्ध खादीचे कापड विणले जाते.
उदगीरमध्ये विणलेले कापड अहमदाबादला पाठवले जाते. येथे केशरी, पांढरा आणि हिरवा असे तिन्ही रंग प्रमाणानुसार रंगवले जातात, जे राष्ट्रध्वजासाठी आवश्यक आहेत.
रंगवलेले कापड पुन्हा नांदेडमध्ये परत आणले जाते, जिथे त्यावर अचूक २४ आरींचं अशोकचक्र छापलं जातं आणि त्यानंतर शिलाई केली जाते.
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात, हुबळी शहराजवळील 'कर्नाटका खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ' ही भारत सरकारकडून अधिकृत मान्यता प्राप्त एकमेव संस्था होती, जिला झेंड्याचं उत्पादन करण्याचा अधिकार होता.
हुबळी येथील संस्थेला पहिलं अधिकृत उत्पादन केंद्र मानलं जातं. अनेक वर्षं हीच संस्था भारतात राष्ट्रध्वज बनवणारी एकमेव संस्था होती.
आता केवळ हुबळीच नाही, तर मुंबई आणि मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे देखील राष्ट्रध्वज बनवले जातात. त्यामुळे उत्पादन केंद्रांची संख्या वाढली आहे.
भारतात बनवला जाणारा सर्वात मोठा राष्ट्रध्वज १४ x २१ फूट आकाराचा असतो. अशा झेंड्यांचा वापर विशेष कार्यक्रमांत केला जातो.