Mansi Khambe
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.
हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगामुळे व्यक्तीचे आयुष्यही वाढते.
योग दिनाच्या निमित्ताने विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि सरकारी विभागांमध्ये योग प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात, ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढते.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’या थीमनुसार सागरी आणि किनारी ठिकाणी विविध योग सत्रांचे आयोजन केले.
या उपक्रमाचा उद्देश शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याची जाणीव करून देणे, तसेच पर्यावरण व पृथ्वीशी असलेला मानवी नात्याचा समतोल अधोरेखित करणे हा आहे.
भारतीय नौदलाने सागरी तळांवर आणि नौदल जहाजांवर योग सत्रांचे आयोजन केले.
यावेळी योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा आणि विविध योगासने केली. ज्यामध्ये नौदल अधिकारी, नौसैनिक यांचा सहभाग होता.
भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याप्रमाणे भगवान पतंजली मुनी यांनी शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे.
योग ही भारतातील हजारो वर्षांपासून चालत आलेली एक अमूल्य देणगी आहे. या दिनामुळे योगाला जागतिक मान्यता मिळाली आणि संपूर्ण जगाने भारताच्या सांस्कृतिक वारशाची कबुली दिली.
योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबत मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत योग ही नैसर्गिक उपचार पद्धत म्हणून मानली जाते.
"योग" म्हणजे "एकत्र येणे". शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय. योग दिन हा मानवतेत एकजुटीचा आणि शांततेचा संदेश देतो.
नियमित योगाचा सराव केल्यास आहार, झोप, ताणतणाव यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे योग दिन हे एका नव्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे अमुल्य घटक ठरते.
२०१५ पासून संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा "International Yoga Day" म्हणून घोषित केल्याने भारताचे सांस्कृतिक नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.