Anushka Tapshalkar
परदेशात जाण्यासाठी विमानच हवं असं नाही! भारतातील काही रेल्वे मार्ग थेट शेजारील देशांशी जोडलेले आहेत. जाणून घेऊया अशी ७ रेल्वे स्थानके!
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
बिहारमधील जोगबनी रेल्वे स्थानक नेपाळच्या सीमेजवळ आहे. येथून भारत-नेपाळ सीमा जवळ असल्याने नेपाळमध्ये सहज जाता येते.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील जयनगर स्थानक भारत-नेपाळ रेल्वे मार्गाशी जोडलेले आहे. येथून नेपाळमधील कुर्थापर्यंत रेल्वेने जाता येते.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
पश्चिम बंगालमधील राधिकापूर स्थानक भारत-बांगलादेश सीमेजवळ आहे. या मार्गाचा वापर प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी केला जातो.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील सिंगाबाद हे महत्त्वाचे सीमावर्ती स्थानक आहे. येथून बांगलादेशातील रोहनपूरशी रेल्वे जोडणी होते.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
पश्चिम बंगालमधील पेट्रापोल हे भारत-बांगलादेश सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि मालवाहतुकीसाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
पश्चिम बंगालमधील हल्दीबारी स्थानक बांगलादेशच्या सीमेजवळ आहे. येथून बांगलादेशची सीमा सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर आहे.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
पंजाबमधील अटारी हे भारत-पाकिस्तान सीमेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. पूर्वी येथून समझोता एक्स्प्रेस पाकिस्तानला जात होती. मात्र, २०१९ पासून या रेल्वेसेवेचे संचालन बंद आहे.
Indian Railway Stations Connected to Foreign Countries
sakal
Maharashtra ST History
esakal