संतोष कानडे
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या आणि व्यस्त रेल्वे व्यवस्थांपैकी एक मानली जाते.
दररोज २ कोटींहून अधिक प्रवासी भारतीय रेल्वेच्या विविध गाड्यांमधून प्रवास करतात.
भारतीय रेल्वेचे जाळे ६८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त असून ते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे.
देशभरातील ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके लाखो प्रवाशांना दररोज सेवा देतात.
भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक असून लाखो कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे असून हजारो किलोमीटरचा प्रवास करते.
गोरखपूर जंक्शन येथील प्लॅटफॉर्म जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतीय रेल्वेच्या काही गाड्या सलग दोन ते तीन दिवस प्रवास करून गंतव्यस्थानी पोहोचतात.
प्रवाशांसोबतच भारतीय रेल्वे दररोज लाखो टन मालवाहतूक करून अर्थव्यवस्थेला गती देते.
डोंगर, वाळवंट, जंगल आणि समुद्रकिनाऱ्यांमधून धावणाऱ्या रेल्वेमार्गांमुळे भारतीय रेल्वेचे महत्त्व अधिक वाढते.