भारतीय रेल्वेतील गाड्यांना उशीर का होतो?

Mansi Khambe

गाड्यांना उशीर

मुंबईकरांची लोकल असो वा कोणतीही लांब पल्ल्याची रेल्वे, कोणतीही ट्रेन उशिराने धावत असल्याचे दिसून येते. रेल्वेच्या विलंबामुळे प्रवाशांना अतोनात हाल सोसावे लागतात.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

कारणं

रेल्वे उशिराने धावण्यामागे तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि नैसर्गिक अशा विविध कारणांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीच्या आधारे गाड्यांना लेटमार्क लागण्याची प्रमुख कारणे काय आहेत? पहाच...

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

ट्रॅफिक

रेल्वेच्या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा 120% ते 150% जास्त ट्रॅफिकमुळे ट्रॅकवर गर्दी असते, ज्यामुळे गाड्यांना उशीर होतो.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

एकत्र मार्ग

भारताचे रेल्वे जाळे जगातील सर्वात व्यस्त रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. एकाच मार्गावरून अनेक गाड्या धावतात. यामुळे जेव्हा एखादी गाडी उशिरा धावते, तेव्हा त्याचा परिणाम त्याच मार्गावरील इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

प्राधान्यक्रम प्रणाली

वंदे भारत / राजधानी अशा VIP गाड्यांसाठी इतर गाड्या लूप लाईनवर थांबवल्या जातात.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

रुळांची देखभाल

भारतीय रेल्वे नियमितपणे देखभाल आणि सुरक्षा तपासणी करते. यामुळे सुरक्षेसाठी नियमित मेगा ब्लॉक, दुरुस्ती आणि कॉशन ऑर्डर्स घेतले जाते. या कालावधीत गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जातो.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

जंक्शन बॉटलनेक्स

मोठ्या जंक्शन्सवर मर्यादित प्लॅटफॉर्म व सिग्नल क्लिअरन्सची प्रतीक्षा असल्यामुळेही रेल्वे विलंबाने धावू शकते.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

नैसर्गिक घटक

हिवाळ्यातील दाट धुके, तसेच पावसाळ्यात दरड कोसळणे, झाडं पडणे, अतिवृष्टीमुळे रेल्वे चालवताना अनेक अडचणी येतात. ज्यामुळे रेल्वेला गंतव्य स्थानी पोहोचण्यास उशीर होतो.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

आवाहन

तथापि, गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रवास करण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना केले जाते.

Indian Railway Gets Delay Reason

|

ESakal

ती कृष्णमूर्ती सध्या कुठे आहे? जिला मीराबाईंनी आपलं पती मानलं होतं...

Meerabai Krishna Idol

|

ESakal

येथे क्लिक करा