Mansi Khambe
देशभरात आज, ४ सप्टेंबर रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या दिवशी भगवान कृष्णाचे बालरूप असलेल्या लाडू गोपालाची पूजा करण्याची प्रथा आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
हिंदू पंचांगानुसार, हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. लोक दिवसभर उपवास करतात आणि रात्री पूजा करतात.
Meerabai Krishna Idol
ESakal
मीराबाई बालपणापासूनच भगवान कृष्णाला आपला पती मानत होत्या. मीराबाईंनी बालपणी पूजा केलेली भगवान कृष्णाची मूर्ती आजही जतन करून ठेवल्याचे इतिहासात नोंद केले आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
इतिहासकार आणि पारंपरिक दस्तऐवजांनुसार, मीराबाईंनी बालपणी आपल्याजवळ ठेवलेली कृष्णाची मूर्ती आता राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील घनेराव पॅलेस येथील एका मंदिरात जतन करून ठेवेली आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
ही मूर्ती मुरलीधरजी म्हणून ओळखली जाते आणि तिचे वर्णन काळ्या संगमरवराची एक दुर्मिळ प्रतिमा असे केले जाते. तिची उंची अंदाजे १४ इंच आहे. ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.
Meerabai Krishna Idol
ESakal
ऐतिहासिक नोंदींनुसार, १५१६ मध्ये विवाहानंतर मीराबाईंनी ही मूर्ती आपल्यासोबत चित्तोरगडला नेली. तिचा आध्यात्मिक प्रवास सुरू असताना, ही मूर्ती तिच्या भक्तीचा एक अविभाज्य भाग बनून राहिली.
Meerabai Krishna Idol
ESakal
यानंतर मीराबाईंनी राजेशाही जीवन सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आणि अखेरीस वृंदावनला स्थायिक झाल्या. यावेळी ही मूर्ती आपला चुलतभाऊ, ठाकूर प्रताप सिंह यांच्याकडे सोपवली.
Meerabai Krishna Idol
ESakal
प्रताप सिंह यांच्या कुटुंबीयांनी नंतर ही मूर्ती घनेराव येथे आणली, जिथे ती जतन करून ठेवण्यात आली. घनेराव महाल राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील घनेराव गावात, अरवली पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
१६०६ साली ठाकूर गोपाल दास जी यांनी बांधलेल्या ऐतिहासिक महालाचे रूपांतर एका हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. मीराबाईंशी संबंधित असलेल्या मुरलीधर जी यांचा पुतळा या महालाच्या आवारात जतन केला आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
याठिकाणी भेट देण्यासाठी जोधपूर आणि उदयपूर दोन्ही शहरांमधून येथे पोहोचता येते. हे राणकपूर जैन मंदिर आणि कुंभलगढ किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांच्या जवळ आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
रेल्वे प्रवाशांसाठी, फलना आणि मारवाड जंक्शन ही सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. तर विमान प्रवाशांसाठी, उदयपूर विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
Meerabai Krishna Idol
ESakal
Ganpati Sthapana at home
ESakal