Mayur Ratnaparkhe
आसाम आणि हरियाणा दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन गुवाहाटी (कामाख्या) ते रोहतक पर्यंत धावेल.
दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (गोमती नगर) पर्यंत धावेल.
तिसरी ट्रेन पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. जलपाईगुडी ते तिरुचिरापल्ली पर्यंत अमृत भारत ट्रेन चालेल.
चौथी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पश्चिम बंगालमधून तामिळनाडूपर्यंत धावेल, जी न्यू जलपाईगुडी ते नागरकोइल पर्यंत धावेल.
पाचवी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार ते कर्नाटकातील एसएमव्हीटी बंगळुरू पर्यंत धावेल.
सहावी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार ते मुंबईतील पनवेल पर्यंत धावेल.
भारतीय रेल्वेच्या मते, सातवी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पश्चिम बंगालमधील संतरागाच्छी ते तामिळनाडूमधील तांबरम पर्यंत धावेल
आठवी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन कोलकात्यातील हावडा येथून दिल्ली-एनसीआरमधील आनंद विहार रेल्वे स्टेशनसाठी रवाना होईल.
नववी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सियालदाह येथून उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील बनारस रेल्वे स्टेशनसाठी रवाना होईल.
Kite History
ESakal