रेल्वे तिकीट बुकिंगचा खास नियम! कोणाला मिळते वर्षभर आधी तिकीट बुकींगची सुविधा?

Shubham Banubakode

वर्षभर आधी तिकीट

सणासुदीला कन्फर्म तिकीट मिळवणं कठीण होतं. पण काही प्रवाशांना भारतीय रेल्वेत तब्बल ३६५ दिवस आधी तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते.

Indian Railways FTQ

|

esakal

विशेष कोटा

भारतात फिरायला येणारे परदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीय म्हणजेच NRI यांना फॉरेन टूरिस्ट कोट्याअंतर्गत आगाऊ तिकीट बुक करता येतं.

Indian Railways FTQ

|

esakal

FTQ

FTQ म्हणजे फॉरेन टूरिस्ट कोटा. या सुविधेअंतर्गत पात्र परदेशी प्रवासी आणि NRI यांना भारतीय रेल्वेच्या काही निवडक गाड्यांमध्ये तिकीट बुक करता येतं.

Indian Railways FTQ

|

esakal

श्रेणी

या कोट्याअंतर्गत फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसारख्या निवडक श्रेणींमध्ये तिकीट उपलब्ध असू शकतं.

Indian Railways FTQ

|

esakal

पडताळणी

IRCTC वर नोंदणी करताना किंवा प्रोफाइल अपडेट करताना आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर द्यावा लागतो. त्यानंतर OTP द्वारे मोबाइल आणि ईमेलची पडताळणी होते.

Indian Railways FTQ

|

esakal

पासपोर्ट

ई-तिकीट बुक करताना परदेशी प्रवाशांना पासपोर्ट क्रमांक द्यावा लागतो. पात्रता आणि आवश्यक माहितीची पडताळणी झाल्यानंतरच या सुविधेचा लाभ घेता येतो.

Indian Railways FTQ

|

esakal

पेमेंट

तिकिटाचं पैसे भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय उपलब्ध असतो. बुकिंगची माहिती नोंदणीकृत ईमेल आणि SMS द्वारे पाठवली जाते.

Indian Railways FTQ

|

esakal

नियम

दिलेल्या माहितीनुसार, FTQ अंतर्गत पात्र परदेशी प्रवाशांना तत्काळ तिकीट बुक करण्याची सुविधाही मिळते. मात्र, तिकीट उपलब्धता आणि लागू नियम तपासणं महत्त्वाचं आहे.

Indian Railways FTQ

|

esakal

मध्यरात्री मांजर लहान मुलांसारखी का रडते?

cat

|

esakal

हेही वाचा -