Shubham Banubakode
रात्री शांततेत मांजरीचा आवाज ऐकून अनेकजण घाबरतात. त्यांच्या म्याव करण्याचा आवाज लहान बाळाच्या रडण्यासारखा वाटतो, त्यामुळे लगेच लक्ष जातं.
Why do cats cry like babies at midnight
esakal
मांजरीला भूक लागली किंवा पाणी हवं असेल, तर ती मोठ्याने म्याव करते. खाण्याची वेळ झाली की तिचा आवाज आणखी वाढू शकतो.
Why do cats cry like babies at midnight
esakal
कधी कधी मांजरीला मालकाचा सहवास हवा असतो. दुर्लक्ष झालं किंवा कंटाळा आला, तर ती आवाज करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
Why do cats cry like babies at midnight
esakal
प्रजननाच्या काळात मादी मांजर मोठ्याने आणि लांब आवाज काढते. नर मांजरही प्रतिसाद देत ओरडू शकतो. त्यामुळे रात्री असे आवाज ऐकू येतात.
Why do cats cry like babies at midnight
esakal
मांजर अचानक विनाकारण रडत असेल, तर तिला दुखापत किंवा आजार असू शकतो. सुस्ती, चिडचिड किंवा लपून बसणं दिसल्यास डॉक्टरांना दाखवा.
Why do cats cry like babies at midnight
esakal
वयस्कर मांजरींना कधी कधी रात्री गोंधळल्यासारखं वाटतं. त्या दिशाहीन फिरतात किंवा मोठ्याने ओरडतात. असं वारंवार घडल्यास पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
Why do cats cry like babies at midnight
esakal
रस्त्यावरच्या मांजरी भूक, तहान, दुखापत किंवा जोडीदाराच्या शोधात आवाज काढू शकतात. लहान पिल्लंही आईला बोलावण्यासाठी मोठ्याने रडतात.
Why do cats cry like babies at midnight
esakal
मांजरीसाठी स्वच्छ पाणी आणि योग्य अन्न ठेवा. ती सतत असामान्य आवाज करत असेल किंवा आजारी दिसत असेल, तर पशुवैद्य किंवा प्राणीसेवी संस्थेशी संपर्क साधा.
Why do cats cry like babies at midnight
esakal
5 Dangerous Animals
esakal