ट्रेनमध्ये गर्भवती महिलांना काय सुविधा मिळतात? तिकीट बुक करण्यापूर्वी जाणून घ्या

Yashwant Kshirsagar

रेल्वेचा प्रवास सुखकर, सुरक्षित

वैद्यकीय उपचार किंवा इतर कारणांसाठी दुसऱ्या शहरात जाताना गर्भवती महिला बहुतेकदा बजेट लक्षात घेऊन रेल्वेचा पर्याय निवडतात. हा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेकडे काही खास व्यवस्था आहेत.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

रेल्वे देते विशेष सुविधा

लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसह सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सोयीस्कर बनवते. गर्भवती महिलांसाठी विशेषतः लोअर बर्थची सोय उपलब्ध आहे.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

वरच्या-मधल्या बर्थचा त्रास

गर्भवती महिलांना वरच्या किंवा मधल्या बर्थवर चढणे-उतरणे कठीण जाते. या समस्येवर उपाय म्हणून रेल्वे खालच्या जागा (लोअर बर्थ) राखीव ठेवते.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

स्लीपर कोचमधील व्यवस्था

स्लीपर कोचमध्ये साधारणपणे ६ ते ७ लोअर बर्थ गर्भवती महिलांसाठी राखीव असतात. यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

थर्ड एसी कोचमधील सुविधा

थर्ड कोचमध्ये साधारणपणे ४ ते ५ लोअर बर्थ राखीव असतात. या जागा विशेषतः गर्भवती महिलांसाठी निश्चित केल्या जातात.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

सेकंड एसी कोचमधील सोय

सेंकड एसी कोचमध्ये साधारणपणे ३ ते ४ लोअर बर्थ राखीव ठेवल्या जातात. यामुळे उच्च वर्गामध्येही गर्भवती महिलांना सुविधा मिळते.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

लोअर बर्थचा मुख्य उद्देश

लोअर बर्थ देण्यामागचा उद्देश म्हणजे वारंवार वर-खाली चढण्या-उतरण्याचा त्रास टाळणे, विशेषतः जेव्हा टॉयलेट वापरायचे असते.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

तिकीट कसे बुक करावे?

गर्भवती महिलेने रेल्वे आरक्षण केंद्रावर (PRS काउंटर) जाऊन गर्भवती असल्याचे जाहीर करणारा फॉर्म भरावा. यामुळे विशेष कोट्यातून लोअर बर्थ मिळण्याची शक्यता वाढते.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

लोअर बर्थ उपलब्ध नसल्यास काय?

जर सर्व लोअर बर्थ आधीच बुक झाल्या असतील, तर प्रवासादरम्यान TTE यांना परिस्थिती समजावून सांगून लोअर बर्थची विनंती करता येते.

Pregnant Women TrainTravel

|

esakal

तुळशीचं रोप दक्षिण दिशेला का ठेवू नये? वास्तुशास्त्रानुसार काय आहे नियम?

Tulsi plant vastu Direction

|

esakal

येथे क्लिक करा