Yashwant Kshirsagar
भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
प्रवाशांना पैसे न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहेत.
ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट अॅपवरही उपलब्ध आहे.
'ट्रॅव्हल नाऊ अॅण्ड पे लेटर' असं या योजनेचे नाव आहे.
अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी पैसे नसतात. अशा स्थितीत या सुविधेचा वापर करता येईल.
पैसे भरण्यासाठी तुम्हाला ईएमआयचा देखील पर्याय उपलब्ध आहे.
तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकता.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.