Saina Nehwal: भारताची 'फुलराणी' सायनाने जिंकलेली महत्त्वाची पदके

सकाळ डिजिटल टीम

सायना नेहवाल

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल 17 मार्च रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Saina Nehwal | X/BAI_Media

वाढदिवस

हरियाणातील हिसारमध्ये 17 मार्च 1990 मध्ये जन्मलेल्या सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवत भारतात महिला बॅडमिंटनला नवी ओळख मिळवून दिली.

Saina Nehwal | X/BAI_Media

महत्त्वाची पदके

भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायनाने कारकिर्दीत 21 आंतरराष्ट्रीय विजेतीपदे मिळवली आहेत. तिच्या काही मोठ्या यशावर एक नजर टाकू.

Saina Nehwal | X/BAI_Media

ऑलिम्पिक पदक

सायनाने 2012 साली लंडनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल होती.

Saina Nehwal | Facebook

वर्ल्ड चॅम्पियनशीप

तिने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत 2015 साली रौप्य आणि 2017 साली कांस्यपदक जिंकले आहे.

Saina Nehwal | X/BAI_Media

आशियाई क्रीडा स्पर्धा

सायनाने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही 2014 मध्ये सांघिक प्रकारात आणि 2018 साली एकेरीत कांस्य पदक जिंकले.

Saina Nehwal | X/BAI_Media

एशियन चॅम्पियनशीप

सायनाने एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेतही 2010, 2016 आणि 2018 साली कांस्य पदक पटकावले आहे.

Saina Nehwal | X/BAI_Media

राष्ट्रकुल

राष्ट्रकुल स्पर्धेत तिने 2010 आणि 2018 साली एकेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर मिश्र दुहेरीत खेळतानाही तिने 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच मिश्र दुहेरीतच तिने 2010 साली रौप्य, तर 2006 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.

Saina Nehwal | X/BAI_Media

पुरस्कार

सायनाला 2009 साली अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले, तर 2010 साली तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सायनाला 2016 साली तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भूषणनेही सन्मानित करण्यात आले.

Saina Nehwal | X/BAI_Media

WPL Final: दिल्ली विरुद्ध बेंगलोर, आतापर्यंत कोण कोणावर ठरलंय वरचढ?

WPL 2024 Final, RCB vs DC | X/wplt20