Mayur Ratnaparkhe
पॅरा एसएफ ही भारतीय सैन्यातील सर्वात प्रमुख विशेष दल आहे. १९६० च्या दशकात स्थापन झालेली ही तुकडी उच्च-जोखीम मोहिमा राबवते.
मार्कोस ही १९८० च्या दशकात स्थापन झालेली नौदलाची एलिट कमांडो फोर्स आहे. मार्कोस भारताच्या सागरी हितांचे रक्षण करते.
गरुड कमांडो फोर्सची स्थापना २००४ मध्ये झाली. त्यांचे काम हवाई तळांचे संरक्षण करणे आणि हवाई ऑपरेशन्सना बळ देणे आहे.
NSG ची स्थापना १९८६ मध्ये झाली आणि ते "ब्लॅक कॅट्स कमांडो" म्हणून ओळखली जातात. हे देशातील प्रमुख दहशतवाद विरोधी दल आहे.
कोब्रा ही सीआरपीएफची एक विशेष तुकडी आहे जी नक्षलवादी आणि बंडखोर भागात काम करते.
सीआरपीएफची व्हॅली क्विक अॅक्शन टीम (क्यूएटी) काश्मीर खोऱ्यासारख्या विशेषतः संवेदनशील भागात तैनात आहे.
SoG ही जम्मू - काश्मीर पोलिसांचे एक एलीट युनिट आहे. ते गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारावर जलद कारवाई आणि दहशतवादविरोधी कारवाया करते.
एसपीजी भारताच्या पंतप्रधानांना आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्याची स्थापना करण्यात आली.
स्पेशल ग्रुप हे RAW मधील एक अत्यंत गुप्त युनिट आहे. ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झाले. जे गुप्त मोहिमा राबवते.
SFF ची स्थापना १९६० च्या दशकात झाली. ते हिमालय आणि संवेदनशील भागात गुप्त मोहिमांमध्ये विशेषज्ञ आहे.