मूर्ती नव्हे मृत शरीर? रामानुजाचार्यांचं शरीर खरंच जतन केलंय?

संतोष कानडे

रामानुजाचार्य

वैष्णव संत आणि विशिष्टाद्वैत वेदांताचे प्रवर्तक रामानुजाचार्य हे भारतातील महान तत्त्वज्ञ होते.

मूर्ती

इ.स. १०१७ ते ११३७- १२० वर्षे आयुष्य लाभलेल्या रामानुजाचार्य यांची मूर्ती म्हणजेच त्यांचं मृत शरीर आहे का?

सोशल मीडियात

असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियात तसे व्हिडीओ व्हायरल होत असून काही इन्फ्लूएन्सर दावे करीत आहेत.

श्रीवैष्णव सांप्रदाय

त्यांचं मृत शरीत मूर्तीच्या स्वरुपात जतन केल्याची दृढ श्रद्धा श्रीवैष्णव सांप्रदायाची आहे. या देहाला थिरुमेनी असं म्हटलं जातं.

वैज्ञानिक पुरावा

मात्र या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. पुरातत्त्व विभागाने मूर्ती म्हणजे मृत शरीर असल्याचं म्हटलेलं नाही.

श्रद्धा

त्यामुळे श्रीरंगममधील रामानुजाचार्यांची मूर्ती खरंच मृत शरीर आहे का, हे सांगता येत नाही. मात्र अशी श्रद्धा शेकडो वर्षांपासून आहे.

ब्रह्मसूत्रांवर

रामानुजाचार्य यांनी ब्रह्मसूत्रांवर भाष्य केलेलं आहे. गीतेवरही त्यांचं भाष्य प्रसिद्ध आहे. वेदार्थसंग्रह हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

समतेचा संदेश

दक्षिण भारतामध्ये त्यांनी वैष्णव धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

अर्थसंकल्पात तरतूद केलेलं हस्तिनापूर नेमकं कसं आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>