Pranali Kodre
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही मालिका खेळत आहे.
या मालिकेतील पर्थला झालल्या पहिल्या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आता दुसरा सामना ऍडलेडला ६ डिसेंबरपासून सुरू होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे.
याच कारणाने गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्यासाठी भारताला ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध कॅनबरा येथे सराव सामना खेळायचा होता.
या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यावेळी भारतीय संघाने त्यांना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली गोलाकार हॅट भेट दिली.
अल्बनीज यांनी यावेळी खेळाडूंशी चर्चाही केली. त्यांनी प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघातील खेळाडूंचीही भेट घेतली.
या सामन्यापूर्वीही २८ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील पार्लिमेंट हाऊसमध्ये अल्बनीज यांनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली होती.
दरम्यान, सराव सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे.