Pranali Kodre
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलाव पार पडला.
या लिलावात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडट याला सनरायझर्स हैदराबादने १ कोटी रुपयांना खरेदी केले.
त्यामुळे तो आयपीएल लिलावात खरेदी होण्याची ही एकूण १३ वी वेळ होती.
तो आयपीएल लिलावात १३ वेळा खरेदी केला गेलेला एकमेव खेळाडू आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच खेळाडू ७ पेक्षा जास्तवेळा आयपीएलमध्ये खरेदी केला गेलेला नाही.
उनाडकटने आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेविल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळला आहे.
उनाडकटने २०१० ते २०१२ आणि २०१६ मध्ये कोलकाताच, २०१३ मध्ये बंगळुरुचे, २०१४ ते २०१५ दरम्यान दिल्लीचे, २०१७ मध्ये पुण्याच्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर २०१८ ते २०२१ दरम्यान राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
२०२२ मध्ये त्याने मुंबईचे, २०२३ मध्ये लखनौचे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०२४ मध्येही तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. २०२५ साठीही त्याला हैदराबादनेच खरेदी केले आहे.