Swadesh Ghanekar
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली
शुभमन गिलसमोर पहिल्याच मालिकेत बलाढ्य इंग्लंडचे आव्हान आहे आणि तेही त्यांच्याच घरच्या मैदानावर
शुभमन गिल हा भारताच्या कसोटी इतिहासातील पाचवा सर्वात तरुण कर्णधार आहे.
पंजाबच्या मातीपासून ते भारतीय क्रिकेटच्या शिखरापर्यंत - पंजाब क्रिकेट असोसिएशनचा मुलगा कसोटी कर्णधार झालाय.
शुभमन गिलचा हा प्रवास कधीच नशिबाचा नव्हता, तर तो नियतीचा होता, असे ट्विट पंजाब असोसिएशनने केले आहे
आजपासून एक नवीन वारसा सुरू होत आहे. संपूर्ण पंजाब तुझ्या मागे उभा आहे, असे ट्विट गिलचा बालपणीचा फोटो करून केले गेले आहे
इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकणे, मला आयपीएल जिंकण्यापेक्षा महत्त्वाचे असल्याचे गिल म्हणाला.
शुभमनने त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केला आणि लहान वयातच त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
शुभमनने विविध वयोगटात पंजाबचे मैदान गाजवले आहे. सातत्यूपर्ण कामगिरीने त्याला इथपर्यंत पोहोचवले आहे.