पंढरपूरजवळ औरंगजेबचा हल्ला झाला तेव्हा पाटलांनी विठ्ठलाची मूर्ती कुठे लपवली?

संतोष कानडे

१६९५ – पंढरपूरवर मोठे संकट!

१६९५ मध्ये पंढरपूरवर मोठे संकट आले. मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी पंढरपूरजवळ पडली होती.

औरंगजेबाचा तळ

औरंगजेबाचा तळ पंढरपूरपासून फक्त २० मैलांवर, बेगमपुरा (ब्राह्मपुरी) येथे होता.

मंदिरांचा विध्वंस

औरंगजेबाने देशभरातील अनेक मंदिरे पाडली होती. आता विठोबाचे मंदिरही धोक्यात आले होते.

विठोबाची मूर्ती धोक्यात!

अशा संकटाच्या काळात पंढरपूरच्या गोपाळ विठ्ठल बडव्यांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला.

देगावच्या पाटलांकडे मूर्ती सुपूर्द!

विठोबाची मूर्ती सूर्याजी आणि जिवाजी पाटलांना देण्यात आली. त्यांनी ती आपल्या शेतातील विहिरीत लपवली.

छत्रपती राजाराम महाराजांचे 'अभय पत्र'

जर हल्ला झाला असता, तर मराठा सेनापती मदत करतील, असे लेखी आश्वासन छत्रपती राजाराम महाराजांनी दिले होते.

१६९९ – औरंगजेबाची छावणी हलली!

१६९९ मध्ये औरंगजेबाची छावणी तिथून हलली. तेव्हा मूर्ती परत पंढरपुरात आणण्याचा निर्णय झाला.

मूर्ती सुपूर्द करताना नोंद!

११ ऑक्टोबर १६९९ रोजी बडव्यांनी सही करून मूर्तीची जबाबदारी परत घेतली. याची कागदोपत्री नोंद आहे.

विठोबाची मूर्ती पुन्हा मंदिरात!

अखेरीस, विठोबाची मूर्ती पुन्हा मंदिरात बसवण्यात आली. विठोबाची वनवास यात्रा संपली आणि भक्तांचे डोळे आनंदाने पाणावले.

'या' गावात आल्यानंतर सर्व वारकरी धाऊ का लागतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>