भारतीय लोक बँकॉकला का जातात? तिथलं नाईट लाईफ कसं आहे?

संतोष कानडे

बँकॉक

पर्यटनासाठी बँकॉकला जाणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या प्रचंड आहे. हे शहरच लोकांचा का आवडतं, याचं कोडच आहे.

बजेट फ्रेंडली

महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे बँकॉक ट्रिप ही बजेट फ्रेंडली असते. विमानाचं तिकीट, राहणं, खाणं, स्थानिक प्रवास सगळंच स्वस्त मिळतं.

थायलंड

बँकॉक हे शहर थायलंडची राजधानी आहे. येथे भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो किंवा व्हिसा ऑन अरायव्हल मिळतं.

मार्केटप्लेस

बँकॉकमधले काही मार्केटप्लेस हे जगप्रसिद्ध आहेत. त्यात Chatuchak Weekend Market, Platinum Fashion Mall जगभरात फेमस आहे.

गॅझेट्स

यासह बँकॉकमध्ये चांगल्या दर्जाचे कपडे, आकर्षक भेटवस्तू, गॅझेट्स मिळतात. खरेदीसाठीही पर्यटक बँकॉकला जातात.

स्ट्रीट फूड

बँकॉकमध्ये चवदार स्ट्रीट फूड मिळतं, जे खिशाला परवडतं. ताजी फळं, सी-फूड अत्यंत वाजवी दरामध्ये मिळतात.

पर्यटक

येथे प्राचीन मंदिरे, जुनी संस्कृती पर्यटकांना आकर्षिक करते. wat arun आणि wat pho अशी भव्य बौद्ध मंदिरे तिथे आहेत.

नाईट लाईफ

नाईट लाईफ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बँकॉकमध्ये रात्रीची जीवनशैली जगण्यासाठी उत्साही लोक जातात.

नाईट मार्केट्स

नाईट लाईफमध्ये रुफचॉप बार्स, नाईट मार्केट्स असे मनोरंजनाचे साधनं भारतीय पर्यटकांना आकर्षित करतात.

आदरातिथ्य

येथील लोक अत्यंत नम्र आणि आदरातिथ्य करणारे आहेत. भारतीयांना इथे मान आणि सुरक्षितता मिळते.

विमानाचं तिकीट स्वस्तात मिळवण्याच्या ट्रिक्स

<strong>येथे क्लिक करा</strong>