India First Book Village: भारतातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ कुठे आहे?

Monika Shinde

पुस्तकप्रेमींसाठी सुंदर गाव

पुस्तकप्रेमींसाठी भारतात एक खास गाव आहे, जिथे घराघरात पुस्तकं आहेत आणि वाचन हीच संस्कृती आहे. या गावाचं नाव आहे भिलार.

Bhilar Known as the Village of Books?

भिलार

सातारा जिल्ह्यात, पुण्यापासून १२० किमी तर महाबळेश्वर पासून १५ किमीवर वसलेलं भिलार निसर्गसौंदर्य आणि मराठी साहित्य यांचं सुंदर मिलन आहे.

Bhilar Known as the Village of Books?

पुस्तकांचं गाव

पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेलं भिलार आज भारतातील पहिलं ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जातं.

Bhilar Known as the Village of Books?

संकल्पना

४ मे २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने भिलारमध्ये पुस्तकांचं गाव ही अनोखी संकल्पना अधिकृतपणे सुरू केली.

Bhilar Known as the Village of Books?

वेगवेगळी वाचनदालनं

गावातील ३५ घरांमध्ये ३५ वेगवेगळी वाचनदालनं आहेत, जिथे कथा, कादंबऱ्या, इतिहास, चरित्रं आणि बालसाहित्य उपलब्ध आहे.

Bhilar Known as the Village of Books?

मोफत वाचन

या गावात वाचनासाठी कोणतंही शुल्क नाही. पर्यटक काही तास किंवा काही दिवस पुस्तकांसोबत शांत वेळ घालवतात.

Bhilar Known as the Village of Books?

पर्यटक

विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि पर्यटक दररोज मोठ्या संख्येने भिलारला भेट देऊन वाचनाचा आनंद घेतात.

Bhilar Known as the Village of Books?

संदेश

“वाचाल तर वाचाल” हा संदेश देत भिलार गाव मराठी भाषा, साहित्य आणि वाचनसंस्कृती जपण्याचं कार्य करत आहे.

Bhilar Known as the Village of Books?

Glassy Skin Tips: थंडीमध्ये Glassy Skin हवी? रात्री ही Night Cream नक्की लावा!

येथे क्लिक करा