जगातील अद्भुत गाव! घरे, बाजार, शाळा सगळं पाण्यावर तरंगतं!

Aarti Badade

अद्भुत तरंगतं गाव

तुम्ही जर साहसी (Adventurous) पर्यटनप्रेमी असाल, तर मणिपूरमधील ‘चंपू खंगपोक’ हे तरंगतं गाव तुमच्या ट्रॅव्हल बकेटलिस्टमध्ये असायलाच हवं.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

स्थान : लोकटक सरोवर

हे अद्भुत गाव मणिपूर राज्यातील लोकटक सरोवरावर वसलेले आहे. हे सरोवर उत्तर-पूर्व भारतातील सर्वात मोठं गोडं पाण्याचं सरोवर आहे.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

'फुमडी' म्हणजे काय?

सरोवरावर जलवनस्पती आणि सेंद्रिय घटकांपासून तयार झालेल्या तरंगत्या बेटांना ‘फुमडी’ (Phumdis) म्हणतात, ज्यावर हे गाव वसले आहे.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

निसर्गावर आधारित जीवन

या फुमडीवर ५०० हून अधिक घरे आणि २००० लोक राहतात. त्यांचे घरं, शाळा आणि बाजार सगळं पाण्यावर तरंगतं!

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

घरांची आणि वीजेची सोय

घरे बांबूपासून बनवलेली असून ती पाण्यावर तरंगतात. वीजेसाठी सोलर पॅनेल्स वापरले जातात आणि वाहतुकीसाठी नाव हे मुख्य साधन आहे.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

पर्यटनासाठी कसे जायचे?

या तैरत्या गावात जाण्यासाठी आधी इम्फाळ (Imphal) शहरात पोहोचा. तिथून मोइरांग किंवा थांगा गावांपर्यंत टॅक्सीने जाऊन नावेतून ‘चंपू खंगपोक’ला जावे लागते.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

खास अनुभव

वारा आणि पाण्याच्या प्रवाहानुसार ही घरे हळूवार डोलत राहतात. हे ठिकाण तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव देतं.

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

🙂😂😍 इमोजीचा शोध कोणी लावला? जाणून घ्या त्यांच्या जन्माची भन्नाट गोष्ट!

Emoji History

|

Sakal

येथे क्लिक करा