Mansi Khambe
आतापर्यंत तरंगते मशीद आणि बाजारपेठ याबद्दल अनेकांनी ऐकले होते. पण भारतात एक तरंगते पोस्ट ऑफिस देखील आहे. जे आपल्या देशात जगातील पहिले तरंगते पोस्ट ऑफिस आहे.
तरंगते पोस्ट खूप मनोरंजक ठिकाण आहे. हे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसून येते. जाणून घ्या याबाबतची अधिक माहिती.
काश्मीरमधील श्रीनगर शहरातील दाल सरोवरात तरंगते पोस्ट ऑफिस आहे. ते लांबून एका बोटीसारखे दिसून येते.
भारतीय पोस्ट ऑफिसचे हे कार्यालय लाल आणि पिवळ्या रंगात बनवले आहे. या तलावाजवळ गेलात तर तुम्हाला 'फ्लोटिंग पोस्ट ऑफिस, दाल लेक' असे लिहिलेले हे कार्यालय दिसेल.
हे पोस्ट ऑफिस ब्रिटिश काळात बांधले गेले होते आणि ते २०० वर्षे जुने आहे. आजही, पोस्टमन एक शिकारा भाड्याने घेतो आणि त्यात दररोज १००-१५० पत्रे पोहोचवण्यासाठी प्रवास करतो.
हे पोस्ट ऑफिस हाऊस बोटमध्ये आहे. त्यात दोन खोल्या आहेत. पोस्ट ऑफिस एका खोलीत चालते, तर दुसऱ्या खोलीत एक संग्रहालय उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये प्राचीन टपाल तिकिटे आहेत.
पोस्ट ऑफिसच्या अद्वितीय वास्तुकलेमुळे हे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. श्रीनगरमधील दाल सरोवराला भेट देण्यासाठी येणारे लोक हे पाहिल्याशिवाय राहत नाहीत.
पहिल्या पोस्ट ऑफिसचे नाव नेहरू पार्क पोस्ट ऑफिस होते. पण २०११ मध्ये त्याचे नाव बदलून फ्लोटिंग पोस्ट ऑफिस करण्यात आले. विशेषतः येथील टपाल तिकिटांवर दाल सरोवराचे चित्र आहे.
भिजवलेले की भाजलेले काजू; कोणती पद्धत आरोग्यासाठी फायदेशीर?