Aarti Badade
२०२५ मध्ये भारतीयांनी धावपळीऐवजी शांत अनुभव, सांस्कृतिक पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्याला जास्त पसंती दिली. मनःशांती आणि आध्यात्मिकता अनुभवण्यासाठी प्रवास वाढला.
Top Viral Destinations 2025
Sakal
'भारताचा ताज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरने २०२५ मध्ये पुन्हा एकदा पर्यटकांना आकर्षित केले. बर्फाच्छादित पर्वत, शांत तलाव आणि सुंदर हवामानामुळे (Beautiful Weather) हे सर्वाधिक हॉट डेस्टिनेशन ठरले.
Top Viral Destinations 2025
Sakal
ऐतिहासिक पर्यटनात ही दोन शहरे चमकली. महाकुंभामुळे प्रयागराजला जागतिक प्रसिद्धी मिळाली, तर वाराणसीतील गंगा आरती, घाटांची शान आणि नवे कॉरिडॉर पर्यटकांचे आवडते ठरले.
Top Viral Destinations 2025
Sakal
जयपूर-उदयपूरच्या पलीकडे, ग्रामीण राजस्थानने लोकांचे मन जिंकले. राजस्थानी संस्कृती, लोककला, मातीची रिसॉर्ट्स आणि पारंपरिक खानपान यामुळे हा भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
Top Viral Destinations 2025
Sakal
श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे वृंदावन २०२५ मध्ये प्रचंड चर्चेत होते. राधा-कृष्ण मंदिरांची शोभा आणि भक्तिमय वातावरणामुळे हे ठिकाण कुटुंबीयांसाठी एक सुंदर ठिकाण बनले.
Top Viral Destinations 2025
Sakal
निसर्गप्रेमींची पहिली पसंती मेघालय ठरली. ढगांनी भरलेल्या दऱ्या, नैसर्गिक पूल , स्वच्छ गावे आणि धबधब्यांमुळे हे राज्य वर्षातील सर्वोच्च नैसर्गिक डेस्टिनेशन ठरले.
Top Viral Destinations 2025
Sakal
२०२५ चा प्रवास अनुभव दाखवतो की, भारतीय आता केवळ गर्दीची ठिकाणं पाहण्यासाठी नव्हे, तर मनःशांती, निसर्ग, संस्कृती आणि आध्यात्मिकता अनुभवण्यासाठी प्रवास करत आहेत.
Top Viral Destinations 2025
Sakal
Chakva Ranbhul Mystery
Sakal