सकाळ वृत्तसेवा
एकेकाळी स्वतंत्र देश असलेला सिक्कीम आज भारताचा अविभाज्य भाग आहे. याच्या विलीनीकरणाची कहाणी.
1642 मध्ये तिबेटी लामांनी फुंटसोंग नामग्याल यांना सिक्कीमचे पहिले चोग्याल (राजा) म्हणून स्थापित केले.
1861 मध्ये झालेल्या करारानुसार ब्रिटिशांनी सिक्कीमवर आपले नियंत्रण स्थापित केले. चोग्याल राजा नाममात्र सत्तेत कायम राहिला.
स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांना सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करायचे होते. परंतु, चीनच्या संभाव्य प्रतिक्रियेच्या भीतीने नेहरूंनी विरोध केला.
1950 मध्ये भारताने सिक्कीमशी केलेल्या करारानुसार, तिथला परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण धोरण आपल्या अखत्यारीत आले.
नेहरूंच्या निधनानंतर आणि थोंडुप नामग्याल यांच्या राजवटीत सिक्कीमने भूतानप्रमाणे स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मागण्यास सुरुवात केली.
1971 नंतर PM इंदिरा गांधी यांनी 'रॉ'ला सिक्कीममध्ये हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले. चोग्यालची सत्ता कमकुवत करण्यात आली.
1973 मध्ये सिक्कीममध्ये राजेशाहीविरोधात मोठे जनआंदोलन झाले. अखेरीस, भारत सरकार, चोग्याल यांच्यात एक करार झाला.
1974 मध्ये सिक्कीममध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि चोग्यालची सत्ता केवळ नाममात्र राहिली.
६ एप्रिल १९७५ रोजी भारतीय सैन्याने हल्ला केला आणि ३० मिनिटात सिक्कीमचा राजवाडा ताब्यात घेतला. चोग्यालला नजरकैद झाली.
1975 मध्ये सिक्कीममध्ये जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जनतेने मोठ्या बहुमताने भारतात सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.
16 मे 1975 रोजी सिक्कीमचा स्वतंत्र देशाचा दर्जा संपून ते भारताचे 22 वे राज्य बनले.