सकाळ डिजिटल टीम
भारतात अशी अनेक गावं आहेत, जिथं परंपरा खूपच अनोख्या आहेत. आज आपण अशाच एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत.
राजस्थानमधील वाळवंटात वसलेलं 'रामदेवो गाव' एका आगळ्यावेगळ्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक पुरुष दोन लग्न करतो.
गावकऱ्यांच्या मते, एकच पत्नी असलेल्या पुरुषाला फक्त मुलीच होतात, तर मुलगा हवा असेल तर दुसरे लग्न करावे लागते, अशी त्यांची धार्मिक समजूत आहे.
विशेष म्हणजे, पुरुषांच्या दोन्ही पत्नी एकत्र, शांततेने राहतात. त्या एकाच घरात राहतात आणि एकमेकींना बहिणीसारखं मानतात.
गावातील नवीन पिढी मात्र या प्रथेवर नाराज आहे. त्यांना ही परंपरा जुनी आणि कायद्याविरुद्ध वाटते.
प्रशासनाला याची कल्पना असली तरी कोणतीही अधिकृत कारवाई अद्याप झालेली नाही. यावर कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करावा लागणार आहे.