'या' मुस्लिम देशाच्या नोटेवर का छापलेले गणपतीचे चित्र? जाणून घ्या अनोखे कारण

Yashwant Kshirsagar

मोदींच्या दौऱ्याने पुन्हा चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक जुन्या नोटेचे चित्र व्हायरल झाले आहे. ही नोट म्हणजे इंडोनेशियाची २०,००० रुपयांची चलनी नोट, ज्यावर भगवान गणेशाचे चित्र आहे.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

मुस्लिम देशात गणपती?

इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. तरीही त्यांच्या चलनी नोटेवर हिंदू देवता गणेशाचे चित्र कसे? ही जिज्ञासा अनेकांना आहे.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

१९९८ मध्ये चलनात

बँक ऑफ इंडोनेशियाने १९९८ मध्ये ही २०,००० रुपयांची नोट जारी केली. एका बाजूला इंडोनेशियाचे राष्ट्रीय नायक आणि शिक्षणतज्ज्ञ की हजर देवान्तारा यांचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला गणपतीचे चित्र.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

ज्ञान, शिक्षणाचे प्रतीक

नोटेवर गणेशाचे चित्र धार्मिक कारणासाठी नव्हते, तर ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शिक्षणाचे प्रतीक म्हणून ठेवण्यात आले होते. संपूर्ण नोटेची रचना शिक्षण संकल्पनेवर आधारित होती.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

भारतीय संस्कृतीचा प्रभाव

इंडोनेशियाची सांस्कृतिक मुळे प्राचीन भारताशी जोडलेली आहेत. पहिल्या सहस्रकात भारतीय व्यापारी आणि विद्वानांनी हिंदू-बौद्ध संस्कृती तेथे नेली. त्यामुळे आजही तेथे भारतीय वारशाचे दर्शन घडते.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

हिंदू बहुल बाली

इंडोनेशियात श्रीविजय आणि मजापहित ही प्राचीन हिंदू-बौद्ध साम्राज्ये फुलली. बाली आजही हिंदू बहुल आहे. प्रंबनन, बोरोबुदुर मंदिरे आणि रामायण-महाभारत परंपरा या संबंधांची साक्ष देतात.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

बुद्धिमत्तेची देवता

इंडोनेशियात गणेशाला ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. म्हणून शिक्षणाशी संबंधित नोटेवर त्यांची निवड स्वाभाविक होती.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

२००८ मध्ये काढून टाकली

२००८ मध्ये ही नोट चलनातून काढून टाकण्यात आली. अनेकांना वाटते की गणेश चित्रामुळे, पण तसे नाही. ही संपूर्ण जुन्या नोटांची मालिका सुरक्षा कारणास्तव मागे घेण्यात आली.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी बदल

बँक इंडोनेशियाने अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन नोटा आणल्या. ३१ डिसेंबर २००८ नंतर ही नोट अधिकृत चलन राहिली नाही.

Ganpati on Indonesia currency

|

Sakal

पावसाळ्यात महाराष्ट्रातील या ५ सुंदर मार्गांवरुन एकदा नक्की करा सफर, मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा