पावसाळ्यात महाराष्ट्रातील या ५ सुंदर मार्गांवरुन एकदा नक्की करा सफर, मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

Yashwant Kshirsagar

पावसाळा

पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील निसर्ग हिरव्यागार शालूने नटतो, अनेक ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

वर्षा पर्यटन

तुम्ही या मान्सूनमध्ये वर्षा पर्यटन करण्याचा विचार करत आहात आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव कमी बजेटमध्ये घेण्याचा विचार करत आहात का?

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

निसर्गाचा आनंद

आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ५ सुंदर अशा मार्गांबद्दल जिथे तुम्ही पावसाळ्याचा मनसोक्त आनंद अनुभवू शकता.चला तर आज जाणून घेऊया

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

वरंधा घाट

महाड ते पंढरपूर महामार्गावरील वरंधा घाट हा अवघड वळणांचा आहे मात्र या घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. रस्त्याच्या कडेला असलेले मोठे-छोटे धबधबे आणि धुके मनमोहक आल्हाददायक वातावरण निर्माण करतात

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

माळशेज घाट

कल्याण के अहिल्यानगर मार्गावर असणाऱ्या या घाटातील वळणावळणाचे रस्ते आणि धबधब्यांचे कोसळणारे पाणी यामुळे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलते.

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

आंबोली घाट

सावंतवाडी ते कोल्हापूर मार्गावर असणारा या घाटात सदाहरित वनराई आहे मात्र या घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. आंबोलीचा मुख्य धबधबा घाटातच असल्याने तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

ताम्हिणी घाट

पुणे-माणगाव महार्गावर असणाऱ्या ताम्हिणी घाटात पावसाळ्यात पर्यटकांची खूप गर्दी होत असते. मुळशी धरणाचे बॅक वॉटर, प्लस व्हॅली आणि हिरव्यागार डोंगररांगा यामुळे घाटाचे सौंदर्य अधिकच बहरते.

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

आंबेनळी घाट

महाबळेश्वर आणि पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट हा अतिशय अवघड मानला जातो. खोल दऱ्या, आणि पावसाळ्यात डोंगराला धडकणारे ढग धुके तसेच घाटातून होणारे प्रतापगड किल्ल्याचे दर्शन यामुळे या पावसाळ्यात अतुलनीय अनुभव येतो.

Monsoon road trips Maharashtra

|

esakal

कारले खाल्ल्याने 'हे'आजार होतात दूर; जाणून घ्या कडू चवीत दडलेलं आरोग्याचं रहस्य!

Benefits of Bitter Gourd For Health

|

esakal

येथे क्लिक करा