पेशव्यांना शनिवारवाडा बांधण्याची कल्पना कोणत्या किल्ल्यावरून सुचली?

सकाळ डिजिटल टीम

शनिवारवाड्याची प्रेरणा

मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील सरसेनापती दाभाडेंच्या भुईकोट किल्ल्याचे उत्कृष्ट बांधकाम पाहून बाजीराव पेशव्यांनी १७३०-३२ मध्ये पुण्यात मुठा नदीकाठी शनिवारवाडा बांधला.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

प्रवेशद्वारातील सारखेपणा

पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याची सुरक्षा रचना मावळातील इंदोरी किल्ल्यावरून प्रेरित होऊन घडवली गेली होती.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

सरसेनापती दाभाडेंनी उभारला किल्ला

सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१ मध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर हा सुंदर भुईकोट किल्ला बांधला.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

पहिल्या महिला सरसेनापतींचा किल्ला

मराठा साम्राज्याच्या पहिल्या आणि एकमेव महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी या किल्ल्यावरून कारभार पाहिला आणि येथे वास्तव्य केले.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

इंद्रायणी नदी

पश्चिमबाजूस आपलं विस्तीर्ण पात्र अंथरलेली इंद्रायणी नदी किल्ल्याला संरक्षण देऊन अधिक बळकट व दुर्गम करते. 

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

एका बाजूला जमीन, दुसऱ्या बाजूला पाणी

हा किल्ला पूर्वेकडून जमिनीवर बांधलेला दिसतो, तर पश्चिमेकडून पाहिल्यास थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात उभा असलेला जलदुर्ग वाटतो.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

तटबंदी आणि ९ भक्कम बुरूज

किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बेसॉल्ट खडकात पाया रचून त्यावर विटांचे ३० ते ४० फूट उंच तट आणि ९ बुरूज बांधण्यात आले आहेत.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

दुहेरी संरक्षणाचे प्रवेशद्वार

शत्रूला रोखण्यासाठी येथे दुहेरी दरवाजांची अनोखी रचना आहे. पहिला दरवाजा फुटला तरी २६ फुटांच्या अंतरावर असणारा दुसरा दरवाजा किल्ल्याचे रक्षण करतो.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

दरवाजावरील सुंदर शिल्पे

किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पौराणिक 'शरभ' प्राण्याची शिल्पे आणि मध्यभागी देवीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

कडजाई देवीचे प्रसिद्ध मंदिर

किल्ल्याच्या आत इंदोरी गावची ग्रामदेवता 'कडजाई देवी'चे मंदिर आहे, जिथे नवरात्रीत आणि चैत्र-वैशाख महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

राजघराण्याकडून स्थापना

नदीकाठी कड्यावर बसलेली म्हणून कडजाई देवी! दाभाडे राजघराण्याकडून देवीची मूर्ती इथे प्रतिष्ठापीत केली गेली.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

जुनी नाणी पाडण्याची टांकसाळ

मराठेशाहीच्या काळात या किल्ल्याच्या आत नाणी (चलन) पाडण्यासाठी एक टांकसाळ उभारण्यात आली होती.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

नदीतून निसटण्याची गुप्त वाट

संकटाच्या वेळी महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरणाऱ्या पायऱ्या येथे बनवल्या आहेत.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

नगारखाना आणि वीरगळी

प्रवेशद्वारावर सुंदर नगारखाना असून किल्ल्याच्या आत मंदिरासमोर ऐतिहासिक वीरगळी पाहायला मिळतात, ज्या तत्कालीन योद्ध्यांच्या शौर्याची साक्ष देतात.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

कोटेश्वर शंकराचे मंदिर

किल्ल्याजवळच नदीकाठी कोटेश्वरवाडी येथे कोटेश्वर मंदिर आहे. उन्हाळ्यात मंदिराच्या पायऱ्यांवरून वाहणारे नदीचे पाणी अतिशय थंड आणि प्रसन्न वाटते.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

येथे कसे पोहोचायचे?

पुण्यापासून अवघ्या ३५ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तळेगाव दाभाडे किंवा घोरावाडी रेल्वे स्टेशनवरून लोकल व बसची सोपी सुविधा आहे.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

एक दिवसाच्या सहलीसाठी उत्तम

पुणे आणि मुंबईच्या जवळ असल्याने वीकेंडला कुटुंब किंवा मित्रांसोबत एक दिवसाच्या ऐतिहासिक सहलीसाठी हा किल्ला उत्तम पर्याय आहे.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

मावळच्या कुशीत

मावळच्या कुशीत वसलेला हा इंदोरी किल्ला मराठेशाहीच्या थोर इतिहासाची आठवण करून देतो.

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

रेल्वे इंजिनला वेगवेगळे रंग का असतात?

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

आणखी वाचा