आळंदीत इंद्रायणीला पूर, चारही पूल बुडाले; तर दुकानांमध्येही पुराचे पाणी; पहा थरारक दृश्ये

Vinod Dengale

इंद्रायणीला पूर

कालच्या मुसळधार पावसामुळे आणि मावळ भागातील धरण साठ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आला आहे.

Alandi Under Water

|

eSakal

चार पूल पाण्याखाली

नदीला आलेल्या पुरामुळे मुख्य चारही पूल पाण्याखाली गेले आहे. यात देहू फाटा ते चाकण रस्ता जोडणारा गरुड स्तंभाजवळील पूल पाण्याखाली आहे.

Alandi Bridge Under Water

|

eSakal

जुना-नवीन पूल पाण्याखाली

आळंदी नगरपरिषद चौक ते देहू फाटा जोडणारा जुना व नवीन पूल दोन्ही पाण्याखाली आहेत.

Alanbdi Road Update

|

eSakal

घरांमध्ये पाणी

संततधार पावसामुळे इंद्रायणीच्या तीरावरील दोन्ही घाटांवर पाणी शिरले असून नदीच्या लगतच्या भक्त निवास तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे.

Alandi Flood 

|

eSakal

नुकसान

त्याचबरोबर जुन्या व नवीन पुलाच्या संरक्षण कठडे आणि त्याला बसवण्यात आलेली जाळी बऱ्याच प्रमाणात वाहून गेले आहेत.

Alandi Bridge Under Indrayani River

|

eSakal

काही वाहतूक बंद

पूलांवरून पानी वाहिल्याने काही पूलांवरून वाहतूक बंद केली असून नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले.

Alandi Road Closed

|

eSakal

दुकानांमध्ये पाणी

नदीकाठच्या दुकानांमध्ये पानी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात जोरदार पावसाने हाहाकार, अनेक भागात पूरस्थिती

pune rain

|

esakal

हेही वाचा