सकाळ डिजिटल टीम
भारतात बनवलेली ‘INS अर्नाळा’ ही युद्धनौका आता भारतीय नौदलात आहे. ती कमी खोलीतील पाण्यात चालते. पाणबुडीविरोधी युद्धासाठी ती खास बनवली आहे.
INS अर्नाळा म्हणजे भारताच्या ‘ब्लू वॉटर नेव्ही’ बनण्याच्या ध्येयातील महत्त्वाचा भाग आहे. यात नवीन तंत्रज्ञान, स्थानिक डिझाइन आणि जागतिक दर्जा आहे.
ही शॅलो वॉटर क्राफ्ट आहे, म्हणजे कमी खोलीच्या पाण्यात ती सहज फिरते. पाणबुड्या शोधणे आणि त्यांना नष्ट करणे हे तिचे मुख्य काम आहे.
INS अर्नाळा हे नाव वसईजवळील अर्नाळा किल्ल्यावरून दिले आहे. हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता?
सन १७३७ मध्ये चिमाजी अप्पा यांनी अर्नाळा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला. हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एक महत्त्वाचा किल्ला होता.
कोकण किनाऱ्याच्या सागरी सुरक्षेसाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची मजबूत दुरुस्ती केली. येथूनच मराठ्यांची सागरी ताकद दिसते.
चिमाजी अप्पा हे पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनीच वसई मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी अर्नाळा, वसईसह अनेक किल्ले मराठा साम्राज्यात आणले.
INS अर्नाळा हे नाव म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान आणि ऐतिहासिक गौरव आहे. हे मराठा साम्राज्याच्या समुद्र तटावरील नियंत्रणाचे आधुनिक रूप दाखवते.
भारतीय नौदल आता इतिहासाची प्रेरणा घेत आहे. ते स्वदेशी ताकदीने सागरी सुरक्षा मजबूत करत आहे.