"इन्स्टाग्राम स्टोरी चुकली तर आता डिलीट करण्याची गरजच नाही! आले 'एडिट स्टोरी' फीचर... कसे वापरायचे? जाणून घ्या झटपट!"

Vinayan

इन्स्टाग्रामवर आले 'एडिट स्टोरी' फीचर!

स्टोरी टाकल्यानंतर लहानशी चूक लक्षात यायची आणि पूर्ण स्टोरी डिलीट करावी लागायची. पण आता तुमचा हा मोठा त्रास संपणार आहे!

Instagram Edit Story Feature

|

Sakal

आधी स्टोरी चुकली की काय व्हायचे?

स्पेलिंगची चूक असो वा टॅग चुकलेला असो, स्टोरी डिलीट करून पुन्हा टाकावी लागायची. त्यामुळे मिळालेले व्ह्यूज आणि इंगेजमेंट निघून जायचे.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

पोस्ट केल्यानंतरही करता येईल बदल!

इन्स्टाग्रामवर 'एडिट स्टोरी' पर्याय आल्याने युजर्सना स्टोरी लाइव्ह असतानाच त्यात आवश्यक ते बदल करणे अधिक सोपे झाले आहे.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

स्टेप १: तुमची लाइव्ह स्टोरी उघडा

सर्वात आधी तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जा आणि तुम्ही पोस्ट केलेली स्टोरी ओपन करा.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

स्टेप २: तळाशी 'More' किंवा 'तीन टिंबांवर' क्लिक करा

स्टोरीच्या कोपऱ्यात किंवा खाली दिलेल्या 'More' (...) पर्यायावर टॅप करा, जिथे तुम्हाला एडिटिंगचे पर्याय दिसतील.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

स्टेप ३: 'Edit' पर्याय निवडा

मेनूमधून 'Edit' पर्याय निवडताच तुमच्या स्टोरीमधील मजकूर किंवा घटक बदलण्यासाठी स्क्रीन तयार होईल.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

मजकूर, टॅग आणि स्टिकर्समध्ये बदल

चुकलेला मजकूर दुरुस्त करणे, राहिलेला व्यक्ती टॅग करणे किंवा स्टिकर्सची जागा बदलणे आता काही सेकंदांत शक्य होईल.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

स्टेप ४: बदल करून 'Done' किंवा 'Save' करा

आवश्यक बदल पूर्ण झाल्यानंतर 'Done' किंवा 'Save' वर क्लिक करा आणि तुमची अपडेटेड स्टोरी लगेच लाइव्ह होईल.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

व्ह्यूज आणि रिच राहतील सुरक्षित!

स्टोरी डिलीट करावी लागत नसल्याने आधी आलेले व्ह्यूज, रिप्लाइज आणि रीच टिकून राहण्यास मोठी मदत होते.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

क्रिएटर्स, ब्रँड्स आणि नियमित युजर्सना फायदा

रोज स्टोरी पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सपासून ते बिझनेस प्रमोशन करणाऱ्या ब्रँड्सपर्यंत सर्वांचाच वेळ आणि मेहनत या फीचरमुळे वाचेल.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

ॲप अपडेट ठेवणे महत्त्वाचे!

हे फीचर तुमच्या अकाउंटवर लगेच दिसण्यासाठी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून इन्स्टाग्राम ॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट केलेले असल्याची खात्री करा.

Instagram Edit Story Feature

|

Sakal

सोशल मीडिया अनुभव अधिक सोपा!

लहानसहान चुकांमुळे स्टोरी डिलीट करण्याचे दिवस आता मागे पडत आहेत. तुम्हीही तुमची स्टोरी एडिट करून पाहा!

Instagram Edit Story Feature

|

Sakal

महाराष्ट्रातील अनोखी 'वडाखालची शाळा'! झाडांच्या सावलीत घडते मुलांचे भविष्य

Rural Education

|

Sakal

हे जाणून घ्या!