फक्त 15 मिनिटांत कुकरमध्ये बनवा झटपट 'चिकन सुक्का'; चवीला एकदम गावरान!

Aarti Badade

झटपट आणि चविष्ट रेसिपी

वेळ कमी असेल आणि गावरान चवीचे काहीतरी खायचे असेल, तर कुकरमध्ये बनवलेला हा 'चिकन सुक्का' तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. अवघ्या २० मिनिटांत ही रेसिपी तयार होते.

Chicken Sukka Recipe

|

Sakal

आवश्यक साहित्य

यासाठी तुम्हाला ५०० ग्रॅम चिकन, २ मोठे कांदे, २ टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, चिकन मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर लागेल.

Chicken Sukka Recipe

|

Sakal

फोडणीची सुरुवात

कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.

Chicken Sukka Recipe

|

Sakal

मसाले आणि चिकनची भर

आता हळद, लाल तिखट आणि तुमचा आवडता चिकन मसाला घालून परता. मसाल्यांचा सुगंध सुटला की चिकनचे तुकडे घालून ५-७ मिनिटे तेल सुटेपर्यंत चांगले वाफवून घ्या.

Chicken Sukka Recipe

|

sakal

कुकरमध्ये फक्त २ शिट्ट्या

चिकन शिजण्यासाठी अगदी पाव कप पाणी घाला (चिकनला स्वतःचे पाणी सुटते, त्यामुळे पाणी कमीच ठेवा). कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर फक्त १ ते २ शिट्ट्या करून घ्या.

Chicken Sukka Recipe

|

Sakal

सुक्या खोबऱ्याची जादू

कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण उघडा. आता त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. यामुळे चव अधिक खमंग लागते.

Chicken Sukka Recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरा. तयार झालेला खमंग चिकन सुक्का गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व्ह करा!

Chicken Sukka Recipe

|

Sakal

चटपटीत ‘मटण मॅगी’ रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!

Quick and Tasty Mutton Maggi Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा