नवरात्र स्पेशल: उपवासाची मऊ व जाळीदार साबुदाणा इडली; जाणून घ्या झटपट रेसिपी!

विनयन वाघमारे

उपवासाला मऊ, जाळीदार इडली हवीय?

नवरात्रीत रोज तेच तेलकट साबुदाणा वडे खाऊन कंटाळला आहात? मग आजच ट्राय करा पचनास हलकी, मऊ आणि लुसलुशीत साबुदाणा इडली! रेसिपीसाठी पुढे नक्की स्वाइप करा

Idali

|

Sakal

तेलकट पदार्थांना उत्तम पर्याय!

उपवासाच्या काळात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि ॲसिडिटी टाळण्यासाठी वाफेवर शिजवलेली ही साबुदाणा इडली अतिशय आरोग्यदायी ठरते. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

Idali

|

Sakal

काय हवे साहित्य?

१ वाटी भिजवलेला साबुदाणा, १ वाटी भगर (वरीचे तांदूळ), अर्धी वाटी ताजे दही, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार सेंधव मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी.

Idali

|

Sakal

पीठ तयार करण्याची पद्धत

भगर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका भांड्यात वाटलेली भगर, भिजवलेला साबुदाणा, दही, मिरची आणि सेंधव मीठ एकत्र मिसळा. १५ मिनिटे हे मिश्रण झाकून बाजूला ठेवा.

Idali

|

Sakal

इडली मऊ आणि स्पंजी कशी होईल?

पीठ थोडे घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला. इडली मऊ आणि जाळीदार होण्यासाठी मिश्रणात अर्धा चमचा इनो किंवा चिमूटभर खायचा सोडा घालून हलक्या हाताने एकाच दिशेने फेटून घ्या.

Idali

|

Sakal

इडली वाफवून घ्या

इडलीच्या पात्राला थोडे तेल किंवा तूप लावा. त्यात मिश्रण ओतून स्टीमरमध्ये मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करून दोन मिनिटे वाफ मुरू द्या.

Idali

|

Sakal

इडली भांड्याला चिकटू नये म्हणून!

इडली पात्रातून काढण्यापूर्वी चमचा किंचित पाण्यात बुडवून घ्या, जेणेकरून इडली सहज सुटते. साबुदाणा छान मोकळा आणि मऊ भिजलेला असणे या रेसिपीसाठी अत्यंत गरजेचे आहे.

Idali

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा आणि आनंद घ्या!

तुमची मऊ, लुसलुशीत आणि चवदार उपवासाची इडली तयार आहे! ही साधी रेसिपी या नवरात्रीत नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबीयांना शेअर करा!

Idali

|

Sakal

पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय आणि धोकादायक बेटे! जिथे जाणे म्हणजे मृत्यू, जाणून घ्या काय आहे रहस्य !

Sakal

हे सुद्धा जाणून घ्या..!