पोट गच्च, फुगल्यासारखं वाटतंय? डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा!

Aarti Badade

पोट फुगण्याची समस्या

ब्लोंटिंग (Bloating) म्हणजे पोट फुगून गच्च झाल्यासारखे वाटणे.उपवास, गोडधोड किंवा बैठे काम करणाऱ्यांना हा त्रास होतोच.घरच्याघरी करता येतील, असे ४ साधे उपाय पाहूया.

Sakal

अन्न व्यवस्थित चावून खा

घाईघाईत जेवल्यास अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पोट गच्च होते. जेवण सावकाश करा. प्रत्येक घास व्यवस्थित चावून (Chew Properly) खा. यामुळे गॅस आणि पोट फुगणे बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

Sakal

ओव्याचा करा वापर

ओवा (Ajwain) अन्न पचनासाठी खूप मदत करतो.दिवसाच्या सुरुवातीला ओव्याचा काढा घ्या. किंवा...जेवणानंतर ओवा बारीक चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या.

Sakal

बडिशेपाचं पाणी

ओव्याप्रमाणेच बडिशेप देखील पचनासाठी उपयुक्त आहे. १ ग्लास पाण्यात बडिशेप उकळून ते कोमट पाणी जेवणानंतर प्या. किंवा जेवण झाल्यावर बडिशेप व्यवस्थित चावून खा.

Sakal

ताजं अन्न खाण्यास प्राधान्य

अपचन आणि गॅसेसचा त्रास असणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा नियम आहे. नेहमी ताजं आणि गरम अन्न खाण्यास प्राधान्य द्या. थंड झालेले किंवा शिळे अन्न टाळा.

Sakal

आराम

सांगितलेले हे आयुर्वेदिक घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. या साध्या टिप्सचा वापर करून पोटाच्या समस्यांपासून लगेच आराम मिळवा!

Sakal

सल्ला

कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

Sakal

त्वचा सतत कोरडी पडते? नॅचरल ग्लोसाठी हा देशी उपाय नक्की करा

Sakal

येथे क्लिक करा