Aarti Badade
हिवाळ्यात त्वचा कोरडी (Dry Skin) होते, ज्यामुळे खाज, पुरळ आणि भेगा (Cracks) पडणे अशा समस्या येतात.बाजारातील प्रॉडक्ट्सचा परिणाम तात्पुरता असतो. यावर सोपा उपाय आहे!
Sakal
गाईचे तूप (Cow Ghee) हे त्वचेला आतून पोषण देते.यामुळे त्वचा सतेज राहते आणि त्वचेसंबंधी विविध समस्या दूर होण्यास मदत होते.
Sakal
गाईचे तूप आहारात घेतल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळते, ज्यामुळे त्वचेचा ओलावा (Moisture) टिकून राहतो.त्वचा मुलायम (Soft) आणि लवचिक (Flexible) राहण्यास मदत होते.
Sakal
तुपामुळे रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारण्यास मदत होते.त्यामुळे चेहरा निस्तेज न दिसता उजळ आणि तजेलदार (Glowing) दिसू लागतो.
Sakal
गाईचे तूप वय वाढल्याची चिन्हे (Signs of Aging) कमी करण्यास प्रभावी ठरते.हे सुरकुत्या (Wrinkles) आणि त्वचा शिथिल होण्याची प्रक्रिया मंद करते.
Sakal
तुपातील पोषक घटक त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतात.संवेदनशील त्वचेसाठी (Sensitive Skin) देखील तूप उपयोगी आहे; खाज आणि जळजळ कमी करते.
Sakal
हिवाळ्यात त्रास देणाऱ्या ओठ आणि टाचांसाठी गाईचे तूप उत्तम पर्याय आहे.रात्री तूप लावून झोपल्यास फुटलेले ओठ आणि भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतात.
Sakal
दररोज १ ते २ चमचे तूप गरम जेवणात (भाकरी, डाळ-भात) घेऊ शकता.रात्री कोमट दुधात (Warm Milk) १ चमचा तूप घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. (टीप: डॉक्टरांचा सल्ला घ्या)
Sakal
Sakal