नवरात्री स्पेशल! उपवासासाठी खास रेसिपी झटपट साबुदाणा इडली

Aarti Badade

उपवासासाठी साबुदाणा इडली साहित्य

१ कप वरीचे तांदूळ (भगर),१/२ कप साबुदाणा,१/२ कप दही,सैंधव मीठ,इनो किंवा बेकिंग सोडा

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

पीठ भिजवणे

वरीचे तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे धुऊन घ्या. दोन्ही २-३ तास पाण्यात भिजत ठेवा.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

वाटणे

भिजवलेले वरीचे तांदूळ आणि साबुदाणा एकत्र करून बारीक वाटून घ्या. पिठात गाठी राहू नयेत, यासाठी पीठ अगदी मऊ वाटून घ्या.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

मिश्रण तयार करणे

वाटलेल्या पिठात दही आणि चवीनुसार सैंधव मीठ घालून चांगले मिसळा. हे मिश्रण १-२ तास बाजूला ठेवा.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

इनो घालणे

इडली तयार करण्यापूर्वी मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट किंवा बेकिंग सोडा घाला. हे लगेच ढवळा. यामुळे इडली मऊ आणि जाळीदार होते.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

इडली वाफवणे

इडलीच्या साच्याला तूप लावा. तयार केलेले मिश्रण साच्यात भरा आणि स्ट्रीमरमध्ये १०-१५ मिनिटे वाफवून घ्या.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

सर्व्ह करा!

गरमागरम, मऊ आणि जाळीदार साबुदाण्याची इडली उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

टीप

गरम तूप वापरल्यास इडलीची चव आणि पोत अधिक चांगला होतो. पीठ कमीत कमी १ ते २ तास भिजवल्याने इडली उत्तम होते.

Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe

|

Sakal

फक्त ५ मिनिटांत बनवा! लहान मुलांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट सुंडल रेसिपी

green moong recipe sundal

|

Sakal

येथे क्लिक करा