Puja Bonkile
दरवर्षी २१ मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो.
अनेक लोक दिवसाची सुरूवातच चहाने करतात.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे चहाचे फायदे सांगणे आणि चहाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा आहे.
आसाम हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे चहाचे मळे लावले गेले.
मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्यास शरीरास अनेक फायदे मिळतात.
शरीर आणि मन फ्रेश राहते.
सर्दी-खोकला झाल्यास आल्याचा चहा प्यावा.
तसेच डोकेदुखी कमी करण्यासाठी देखील चहा फायदेशीर ठरतो.