'या' गोलंदाजांना षटकार मारणं महाकठीण काम; हंगामात दाखवला फार चिंगुसपणा

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 1124 षटकार मारले गेले आहेत. मात्र मुंबईच्या जसप्रीत बुमराहला षटकार मारणं फार कठिण. त्यानं 311 चेंडूत फक्त 10 षटकार मारता आले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला देखील षटकार मारणं तेवढं सोपं नाही. त्याने 264 चेंडूत फक्त 10 षटकार खाल्ले आहेत.

राजस्थान रॉयल्सचा स्टार डावखुरा फलंदाज ट्रेंड बोल्टने 254 चेंडूत 11 षटकार दिले आहेत.

गेल्या हंगामात एका षटकात पाच षटकार खाऊन फेमस झालेल्या यश दयालने यंदा मात्र दमदार मारा करत 259 चेंडूत फक्त 11 षटकार दिले आहेत.

फिरकीपटूला षटकार मारणं सोपं असतं अशी धारणा आहे. मात्र अश्विन याला अपवाद आहे. त्याने 258 चेंडूत 14 षटकार खाल्ले आहेत.

सुनिल नारायणने यंदाच्या हंगामात फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने 282 चेंडूत फक्त 14 षटकार दिले आहेत.

भुवनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये प्रभावित केलं. फलंदाजांना भुवीच्या 270 चेंडूत फक्त 15 षटकार मारता आले आहेत.

क्रश...प्रपोज....अन् स्माईल; गंभीरच्या इन्स्टा पोस्टनं विषयच संपवला!