सकाळ डिजिटल टीम
नुकतीत लखनौ सुपर जायंट्स संघाचे संजीव गोएंका यांनी एलएसजीचा नवा कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या नावाची घोषणा केली.
आयपीएलमधील ७ संघांनी आपले कर्णधार ठरवले आहेत, तर केकेआर, डीसी, आरसीबी या ३ संघांनी अजूनही आपला कर्णधार निवडलेला नाही.
एलएसजीने आपला नवा कर्णधार म्हणून ऋषभ पंतची निवड केली आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी एमआय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या असणार आहे.
एसआरएच संघ २०२५ आयपीएल हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
आगामी हंगामात देखील शुभमन गिल गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी दिसेल.
पंजाबने कर्णधार पदाचा चेहरा म्हणून केकेआरचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला संघात सामील केले.
आरआर संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळताना पाहायला मिळेल.
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसके संघ आगामी आयपीएल हंगाम खेळणार आहे.