Shubham Banubakode
IPL चा १८वा हंगाम २२ मार्च पासून सुरु होतो आहे. यंदा १० संघ आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत.
पण या संघाच्या कर्णधारांचे कर्णधार आयसीसी टी२० क्रमवारी कोणत्या स्थानावर आहेत, तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
कर्णधार ऋतुराज गायकवाड आयसीसी टी२० फलंदाजांच्या यादीत ५८९ अंकांसह २४व्या क्रमांकावर आहे.
कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजांच्या यादीत ५२व्या, गोलंदाजांच्या यादीत ५०व्या तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
कर्णधार अक्षर पटेल आयसीसी टी२० अष्टपैलूंच्या रँकिंगमध्ये १२व्या स्थानावर आहे.
कर्णधार संजू सॅमसन आयसीसी टी २० फलंदाजांच्या यादीत ३६व्या स्थानांवर आहे.
केकेआरचा कर्णधार अंजिक्य रहाणे, लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत आणि पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर पहिल्या १०० मध्येही नाहीत.
कर्णधार रजत पाटीदार याचं अद्याप टी२० मध्ये पदार्पण झालेलं नाही.
कर्णधार शुभमन गील आयसीसी टी २० फलंदाजांच्या यादीत ४१व्या स्थानावर आहे.
कर्णधार पॅट कमिन्स आयसीसी टी२० गोलंदाजांच्या यादीत ५१व्या क्रमांकावर आहे.