Pranali Kodre
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच ९ मार्च रोजी दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
हे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा मुंबईत परतला होता.
घरी थोडावेळ घालवल्यानंतर तो कुटुंबासमवेत मालदीवला फिरायला गेला आहे.
रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह आणि त्यांची मुलं समायरा व आहान देखील आहेत.
रोहित शर्माने मालदीपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहितने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'Sun Sea Sand.. Just what the doctor ordered.'
रोहित आता मालदीवमधील सुट्ट्यांवरून परतल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ स्पर्धा खेळताना दिसणार आहे.